औषध प्रशासनाचा गलथान कारभार | माणसांची व पशुंची सुरक्षीतता रामभरोसे

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील अनेक माणसांच्या व जनावरांच्या औषध दुकानांची सुरक्षीतता रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.रासायनीक औषध विक्रेत्यांन कडून सुरक्षीतता व औषध प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून औषधांची विक्री केली जात असून माणसे व जनावरांच्या जीवीताशी खेळ केला जात आहे.वास्तविक पाहता औषध हि माणसाच्या, जनावरांच्या व पिकांच्या जिवीतासाठी जिवनदायीत्व ठरत असतात.मात्र इंदापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी औषध विक्री व्यवसायीकां कडून शासकीय नियम डावलून औषध प्रशासनाच्या मानांकनांना केराची टोपली दाखवत व्यवसाय केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

औषध प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक का ?

गेली अनेक वर्षांपासून अशा प्रकारे औषध विक्रेत्यांन कडून नियमांची व औषध प्रशासनाच्या आणि शासनाच्या मानांकनांची पायामल्ली होत‌ असताना देखील याकडे औषध प्रशासन व आरोग्य विभागा कडून कोणतीही कारवाई किंवा दखल का घेतली जात नाही.यामागच गौडबंगाल नक्की काय आहे असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे.औषधालय (मेडिकल) सुरू करण्यासाठी शासनाने अनेक नियम घालून दिले असून प्रथम तर माणूस अथवा जनावरांच्या औषधालय चालकांची शैक्षणिक पात्रता हि डी.फार्मा (D.Pharm) अथवा बी.फार्मा (B.Pharm) असणे आवश्यक असते.तर शेतीच्या औषधालयासाठी बी.एस्सी. ॲग्रीकल्चर (B.Sc. Agriculture), बी.टेक. (Agri. Engg.) अथवा कृषी विभागाचा एक वर्षाचा (Diploma in Agricultural Extension Services for Input Dealers) हा डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेला असावा.औषधालया मध्ये औषधा व्यतिरिक्त जनरल स्टोअर्स चे साहित्य नसावे,औषधालया मधील औषधा वरती व त्यांच्या कार्यक्षमतेवरती बाहेरील वातावरणाचा प्रभाव पडु नये म्हणून ती वातानुकूलित असावीत मात्र हे व यासारखे अनेक नियम धाब्यावर बसवून इंदापूर तालुक्यात औषधालय चालवली जात आहेत.

हा तर कहरच…

हे सर्व कमी कि काय म्हणुन अनेक माणसांच्या, जनावरांच्या व शेतीच्या औषधालयात दहावी बारावी पास नापास मुले अथवा व्यक्तींना बसवून त्यांच्या विश्वासावर हि औषधालय चालवली जात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे माणसे,जनावरे व शेतातील औषधे हि अशा अशिक्षित किंवा त्या संबंधित ज्ञान नसलेल्या लोकांकडून घेणे हे धोकादायक बनत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button