इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी: गणेश गुप्ते,भवानीनगर

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये कुत्र्यांचा धुमाकूळइंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निंबोडी गावांमध्ये भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.सध्या निंबोडी भागांमध्ये शेतीमध्ये कांदा, गहू, हरभरा ही पिके उभी असून भटकी कुत्री शेतामध्ये पिकांचे नुकसान करत आहेत.

शासनाच्या वतीने यापूर्वीच भटक्या कुत्र्यांसाठी व्यवस्थापनासाठी स्थानिक स्वराज्य संस्था यांना जबाबदार असल्याचे म्हटले आहे. व शासनाने याबाबत नियमावली देखील परिपत्रक काढून जाहीर केलेले आहे. मात्र तरीदेखील इंदापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.ऐबीसी या कार्यक्रमाद्वारे भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणासाठी मदत केली जाते ज्यामुळे कुत्र्यांची संख्या कमी होण्यास मदत होते. आणि रेबीज सारख्या आजारावर नियंत्रण ठेवता येते. मात्र शासनाने केलेल्या नियमांना ग्रामपंचायत प्रशासन केराची टोपली दाखवत असून भटक्या कुत्र्यांबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. असीच परिस्थिती भवानीनगर, सणसर, उदमाईवाडी, घोलपवाडी, हिंगणेवाडी, उद्धट, तावशी, कुरवली, मानकरवाडी, पवारवाडी, जाचकवस्ती, रायते मळा, खरातवस्ती, या भागामध्ये अनेक भटकी कुत्री फिरत आहेत. संध्याकाळचा फायदा घेत ही कुत्री अचानक ग्रामस्थांवर ते हल्ला देखील करत आहेत. तसेच गावातील जनावरे, शेळ्या मेंढ्या, यांच्यावर देखील अचानक हल्ला करत असून यामध्ये अनेक शेळ्या व मेंढ्या दगावल्या आहेत. ग्रामपंचायत निंबोडी, सणसर, पवारवाडी, मानकरवाडी, कुरवली, या भागातील अनेक कामगार देखील संध्याकाळच्या वेळी मोटरसायकल वरून ये -जा करत असताना भटकी कुत्री मोठ्या संख्येने येत ग्रामस्थांवर हल्ला करत असून ग्रामपंचायत प्रशासनाने यावरती कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button