
लोकशासन-प्रतिनिधी: संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
राज्य सरकारने घरकुल योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात तब्बल ५०,००० रुपयांची वाढ केली आहे. गोरगरिबांसाठी ही योजना आणखी फायदेशीर ठरणार असून, यामुळे घरकुल उभारणीसाठी अधिक आर्थिक मदत मिळणार आहे.महागाई आणि वाढत्या बांधकाम खर्चाचा विचा करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शासन निर्णयात दिली आहे.
“घरकुल योजना अधिक प्रभावी करण्यासाठी आणि गरजूंना अधिक मदत मिळावी यासाठी अनुदानात वाढ केली आहे. त्यामुळे आता अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल,” असे शासन निर्णय घेण्यात आला.शासनाच्या या निर्णयामुळे गोरगरीब, आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल स्वप्न साकार होण्यास मदत होईल. वाढीव अनुदानामुळे त्यांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न आता आणखी साकार होणार आहे.
या निर्णयानुसार केंद्र पुरस्कृत घरकुल मंजूर लाभार्थीना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून ५०,००० एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या रू ५००००/- रकमेमधून रू. ३५०००/- अनुदान हे घरकुल बांधण्यासाठी तर १५०००/- इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्याघर योजनेतून छतावर १ kv मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा उभारणी करिता केंद्रशासनाकडून मिळणाऱ्या अनुदान व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील. जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाही त्यांना सदरील रू. १५०००/- अनुदान देय असणार नाही. असा शासन निर्णय करण्यात आला.