
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
वाडेबोल्हाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात साफसफाईचे काम करणाऱ्या महिलेच्या मुलीच्या ऑपरेशन करीता जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांकडून एक लाख रुपयाची मदत करण्यात आली.याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपीक उमाकांत सूर्यवंशी यांनी साफसफाई करणाऱ्या महिलेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रात हसणारी खेळणारी आनंदाने बागडणारी सर्वांची लाडकी संध्या.. तिच्या जीवनात अशी काही नावाप्रमाणे संध्याकाळ होईल असे त्या चिमुकलेली माहिती नव्हते. सदर मुलीला ऐकता येत नाही म्हणून बोलता येत नाही त्यासाठी पुणे येथील के ई एम हॉस्पीटल मध्ये पुढील तपासणी व उपचाराकरीता सर्व स्तरावरच्या तपासण्या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून करून घेतलेले आहेत व पुढील उपचार केईएम हॉस्पिटल पुणे या आहेत ठिकाणी सुरू आहेत ऑपरेशनचा निर्णय घेण्यापूर्वी तिला ऐकू येण्याचा पहिला टप्पा म्हणून कानाचे एक मशीन घेणे आवश्यक आहे त्याचा अंदाजीत खर्च २५ ते ३० हजार रुपये इतका असण्याची शक्यता संबंधितांनी कळविली आहे सामाजिक बांधिलकी म्हणून ज्यांना मदत करणे शक्य आहे त्यांनी मदत करावी अशी विनंती उमाकांत सुर्यवंशी यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांना आव्हान सदर मुलीच्या ऑपरेशन साठी एकूण ८ लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे. 9021677695 या मोबाईल नंबर वर मदत करण्यात यावी.तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या कडून जि प निधी म्हणून मदत होण्याबाबत जिल्हा परिषद सर्व कर्मचारी समन्वय समिती संघटना म्हणून प्रयत्न करणार आहे त्या मुलींला मदत उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी प्रयत्न करत असून या उपक्रमासाठी उमांकात सुर्यवंशी, शेखर गायकवाड, सुहास संचेती, हेमा कुलकर्णी, विजय बेडेकर, नानासाहेब मारकड , प्रकाश सणस जितेंद्र चासकर, मयुर एकके प्रशांत किराड, रेश्मा शेख, सरोज चिंदे इतर कर्मचारी मदतीसाठी प्रयत्न करत आहेत.