
लोकशासन-प्रतिनिधी: गणेश गुप्ते,भवानीनगर
सिबिल खराब असताना लोन करून देतो अशी फसवी टोळी सध्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर मध्ये सक्रिय झाली असून पोलिसांनी या टोळीचा परदा फास करावा अशी मागणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी मागणी केली आहे.गेल्या पाच ते सहा महिन्यापासून हे टोळी भवानीनगर परिसरात सक्रिय असून या फायनान्सचे ऑफिस बारामती येथे कचेरी रोड वरती आहे. आणि याच फायनान्सचे काही एजंट इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये फिरत आहेत. एखाद्याला गरज असल्याचे पाहून त्या ग्राहकाची जवळनुक साधत त्याला सांगितले जाते की तुझे सिबिल जरी खराब असले तरी तुला वीस लाख लोन मिळवून देऊ असे आमीश दाखवले जाते. व त्यानंतर आधी पाच हजार रुपये द्या तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड ,द्या अशी मागणी केली जाते.
आपल्याला वीस लाख रुपये कर्ज मिळते या आशेने त्या फायनाच्या व्यक्तीला पाच हजार रुपये देतो व त्यातच तो फसतो असतो. अशा अनेक लोकांनी फोन पे द्वारे पैसे दिलेले आहेत. भवानीनगर जवळच असलेल्या भाग्यनगर परिसरात अनेक लोकांनी अशाच पद्धतीने कोणी रोख पैसे तर कोणी ऑनलाईन पेमेंट केलेले आहे. मात्र गेल्या सात ते आठ महिन्यापासून या फायनान्स कडून सांगितले जात आहे. या महिन्यात होईल पुढील महिन्यात होईल असे आश्वासन दिले जात आहेत. मात्र कर्ज काही मिळायला तयार नाही. मात्र इंदापूर ते बारामती हे काय कनेक्शन आहे असा प्रश्न फसवणूक झालेल्या तक्रारदाराने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. तसेच इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आशा अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येण्याचे चिन्ह सध्या दिसत आहे. त्याचबरोबर या भागात फिरून यांच्या एजंट ने अनेक माया लुटली आहे. तसेच अनेक नागरिकांना पैसे देतो देतो म्हणून झुलवत ठेवण्याचे प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत. मात्र वालचंद नगर पोलिसांनी अशा सक्रिय टोळीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी फसवणूक झालेल्या नागरिकांमधून होत आहे.