
लोकशासन-प्रतिनिधी: गणेश गुप्ते,भवानीनगर
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर (अशोकनगर) या भागामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आज दि.(१०) पासुन अजिंक्य क्रीडा मंडळ अशोकनगर यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१० एप्रिल रोजी रात्री ९ वा. गर्जना माझ्या भिमाची या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त भावनीगर येथील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४वा. रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे रात्री ९ वा. जादूगार शक्ती कुमार पुणे यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.१२ एप्रिल रात्री ८ वा. होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे.१३ एप्रिल रोजी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर डॉ. धर्मराज भोसले (हृदयरोग मधुमेह व किडणी तज्ञ)डॉ. नंदकिशोर साळुंखे (फॅमिली फिजिशियन) डॉ. पूजा साळुंखे (आयुर्वेदाचार्य) होणार आहे.
दुपारी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन अशोक नगर यांच्यावतीने करण्यात आले आहे.१४ एप्रिल ला सकाळी ०७:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भवानीनगर येथील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. ८ वा.३०मि. अशोकनगर बुद्ध विहार येथे पूजा पटनाचा कार्यक्रम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण होणार आहे.९ वा. जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यमान आमदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे क्रीडा ,युवक कल्याण, अल्पसंख्याक व औकाफ मंत्री महाराष्ट्र राज्य हर्षवर्धन पाटील , अध्यक्ष राष्ट्रीय साखर संघ दिल्ली व माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते होईल व त्यानंतर भव्य मिरवणूक भवानी नगरच्या दिशेने गेले अशी माहिती अजिंक्य क्रीडा मंडळ भवानीनगर (अशोकनगर) जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष मोहन सुरूडकर, उपाध्यक्ष चंद्रकांत (राजाभाऊ) जाधव, खजिनदार दिनेश शिंदे, सह खजिनदार राजेंद्र पिलाल, सचिव विकास अडसूळ, सहसचिव नाथा वाघमारे, कार्याध्यक्ष संतोष वाघमारे, सह कार्याध्यक्ष शरद भोसले, सल्लागार सिद्धार्थ मिसाळ दत्तात्रय चव्हाण, सह सल्लागार शंकर (लालु) कांबळे, अवि चितारे यांनी याबाबत माहिती दिली.