
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे , इंदापूर ग्रामीण
भिगवण पोलीस स्टेशनचे आवारामध्ये असलेली फोर व्हिलर वाहने व टू व्हीलर वाहने बन्यान दिवसांपासुन पडुन आहेत. सदर बाहने घेवुन जाण्यासाठी विविध प्रसार माध्यमांव्दारे यापुर्वी आहवान करून देखील सदरच वाहनांचा ताबा घेण्यासाठी कोणीही मुळ मालक हे पोलीस स्टेशन येथे आले नाही अगर त्यांनी कोणत्याही प्रकारे संपर्क साधालेला नाही. त्यामुळे भिगवण पोलीस स्टेशनचे आवरामध्ये असलेल्या सर्व बेवारस व अपघातातील वाहनांचा दिनांक १५/०४/२०२५ रोजी भिगवण पोलीस स्टेशन येथे स्कॅपमध्ये लिलाव करण्यात येणार आहे.
लिलाव करून सदरची वाहने ही जागेवर स्कंप करण्यात येणार आहेत. या लिलाव प्रकीयेमध्ये ज्या अधिकृत भंगार व्यवसायीक यांना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी त्यांचा अधिकृत परवाना, आधार कार्ड, घेवुन भिगवण पोलीस स्टेशन येथे दिनांक. १५/०४/२०२५ रोजी सकाळी ११:०० वा हजर रहावे असे भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी आवाहन केले आहे.