
लोकशासन-प्रतिनिधी : गणेश गुप्ते , भवानीनगर
आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या कालावधीमध्ये भूमापन करण्याचा उद्देश असा होता की महसूल जमा व्हावा. त्यावेळी महसूल ची महाराष्ट्र मध्ये सुरुवात झाली. यामध्ये प्रथमच इंदापूर तालुक्यातील भिगवण गावातुन सुरुवात झाली अशी माहिती इंदापूर भूमी अभिलेख अधीक्षक सुशील पवार यांनी दिली.
दि.(१०) रोजी दुपारी इंदापूर तहसील कचेरी मध्ये भूमी अभिलेख कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुका यांच्या वतीने भूमापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलत होते आपल्या देशामध्ये १० एप्रिल १८०२ साली भूमापनाची सुरुवात झाली.
शंकू साखळीच्या मोजणी पासुन त्यानंतर प्लेन टेबल आले , दुर्बीण आले, इटीएस, आज आपण रोवर पर्यंत पोचलो आहे. यानंतर आपण ड्रोन ने देखील सर्वे केला जातो.आज गावोगावी त्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करून, त्यांना मालमत्ता पत्रक सुद्धा पुरवण्याचे सुद्धा मोठे कार्य भूमी अभिलेख कार्यालय करत आहे. ग्रामीण भागामध्ये ८ अ हा अभिलेख असायचा त्याचे कोणतेही बँकेमध्ये ग्राह्य धरले जात नव्हते. लोन दिले जात नसायचे मात्र आज त्याचे प्रॉपर्टी कार्ड तयार केलेले आहे.नकाशे तयार केलेले आहेत ड्रोन च्या सर्वेच्या माध्यमातून स्वामित्व योजनेच्या अंतर्गत त्यानुसार आज ज्या जमिनीचे खरेदी-विक्री चे व्यवहार केले जातात.
त्यामुळे खरेदीचे व्यवहार जास्त होतात नागरिकांना अडीअडचणींना त्या गोष्टीचा उपयोग होतो शिवाय प्रॉपर्टी कार्ड असल्यास प्रॉपर्टी कार्ड आधारे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज दिले जाते .शिवाय आपल्याला एखादी घरकुल सारखी योजना किंवा शासकीय कोणत्याही योजना घ्यावयाची असल्यास प्रॉपर्टी कार्ड द्वारे फायदे घेता येतात.सध्या मोजणीचे शासनाने नवीन सॉफ्टवेअर वर्जन-२ आणले आहे या मध्ये नागरिक घरबसल्या मोजणीसाठी अर्ज करू शकता. ऑनलाइन शासकीय शुल्क भरू शकता. शुल्क भरल्यानंतर नागरिकांना त्याच वेळी मोजणीची तारीख देखील येते. मोजणीसाठी कोणते कर्मचारी येणार आहेत त्याचे नाव व संपर्क क्रमांक येतो. अशा पद्धतीने घरबसल्या मोजणीसाठी अर्ज करू शकतो .वर्जन-२ च्या माध्यमातून मोजणीचे काम ही पार पाडले जाते.
आज भुमिअभिलेख कार्यालयाने पूर्ण कात सोडलेली आहे. आज नागरिकांना कमी वेळेमध्ये चांगली सुविधा कशी देता येईल. यासाठी भूमी अभिलेख कार्यालय प्रयत्नशील आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी वर्जन-२ या वेबसाईटचा वापर करावा असे आव्हान इंदापूर भूमी अभिलेख अधीक्षक सुशिल पवार यांनी केले यावेळी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, सणसर अध्यक्ष गणेश गुप्ते, सचिव मंगेश खरात आधी भुमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर असा करावा लागणार अर्ज
१)विहित नमुन्यातील मोजणे अर्ज
२) तीन महातील मूळ ७/१२ मिळकत उतारा.
३) ७/१२ मधील सहधारकाच्या नावे, पत्ता, मोबाईल नंबर, व संमतीदर्शक सह्या.
४) लगत धारकाचे नावे व पत्ते, व गट नंबर, मोबाईल नंबर.
५)७/१२ मधील ज्यांची नावे मोजणी अर्ज दाखल करावयाचा आहे त्यांचा फोटो व ओळखपत्र छायांकित प्रत.
६)१०/-रु. कोर्ट फी स्टॅम्प
७) गट नकाशा
८) स्कीम उतारा/आकार फोड/आकार बंद.
९) फाळणी नकाशा/गट बुक
१०) टिपण उतारा अशी लागणार कागदपत्रे.