
लोकशासन- प्रतिनिधी : अमोल रजपूत, वालचंदनगर
एकीकडे अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीला लगाम, तर दुसरीकडे महसूल वाढीसाठी प्रोत्साहन देत पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातून तब्बल तीन हजार कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत महसुलात ९.८५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर २०२३-२४ मध्ये महसूल २ हजार ७२९ कोटी ४४ लाखाच्या घरात होता.
बनावट मद्यनिर्मिती आणि बेकायदेशीर मद्य वाहतूक व विक्री रोखण्याचे मोठे आव्हान उत्पादन शुल्क विभागापुढे असते. या विभागाकडून मद्यार्कयुक्त पदार्थांवर उत्पादन शुल्क आकारले जाते. तसेच मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यासंदर्भातल्या गुन्ह्यांचे ६ हजार गुन्हे, ५ हजार ८०० आरोपींना बेड्या एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान, अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध ५ हजार ९९५ गुन्हे दाखल केले असून, ५ हजार ८९१ आरोपींना अटक केली आहे. तसेच ६२१ वाहने जप्त करून २५ कोटी ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गुन्हे अन्वेषणाची कामगिरी ४० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.
अन्वेषण करण्याचीही जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाकडे असते. तसेच दारूनिर्मितीसह परराज्यातून छुप्या पद्धतीने जिल्ह्यात येणारी कोट्यवधींची दारू जप्त केली. अनेक मागील वर्षीच्या तुलनेत पुणे उत्पादन शुल्क विभागाने महसुलात ९.८५ टक्के वाढ नोंदविली आहे. तसेच गुन्हे अन्वेषणाची कामगिरी ४० टक्क्यांनी वाढली असून, अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक करणाऱ्याविरुद्ध ५ हजार ९९५ गुन्हे दाखल करून ५ हजार ८११ आरोपीना अटक केली आहे.
सराईत गुन्हेगारांविरुद्ध ५७७ प्रस्तावप्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध दंडाधिकारी यांच्याकडे ५७७ प्रस्ताव सादर केले आहेत. तर चांगल्या वर्तणुकीबाबत २९९ बंधपत्रे घेण्यात आली आहेत. एमपीडीए कायद्यांतर्गत दाखल केलेल्या ९ प्रस्तावांपैकी १ प्रकरणात सराइतावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
गावठी दारूअड्यांवर कारवाई करून आरोपींना अटकदेखील केली. या सर्व कारणांमुळे उत्पादन महसुलात वाढ झाली शुल्कच्या आहे. ही धाब्यावर मद्यविक्री, सेवन करणाऱ्यांना चाप धाब्यांवर अवैध पद्धतीने मद्यविक्री करणाऱ्यांबरोबरच सेवन करणाऱ्या ग्राहकांच्या विरुद्ध ४५५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये १ हजार २५० आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाद्वारे आरोपींना ८ लाख १९ हजारांचा आर्थिक दंड ठोठाविण्यात आला आहे. बेकायदा मद्यविक्री, निर्मिती आणि वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी विभागाने २१ पथकांची निर्मिती केली आहे. त्यांच्यामार्फत ही धडक कारवाई करण्यात येते.
कामगिरी उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विभागीय उपायुक्त सागर थोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे उत्पादन शुल्क विभागाने केली आहे.