
लोकशासन-प्रतिनिधी : पुणे ग्रामीण
इंदापूर तालुक्यातील कळंब या गावामध्ये १३ एप्रिल रोजी आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.कळंब येथील युवा उद्योजक राहुल पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त कळंब येथील लासुर्णे रस्त्या लगत असलेल्या ५७ चाळ या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे उद्धाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार असून शर्यतीचे उद्धाटन व राहुल पाटील यांना अभिष्टचिंतन दिनाच्या शुभेच्छा भरणे यांच्या कडून देण्यात येतील.
आमदार केसरी बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षिस ७१००० रुपये, व्दितीय क्रमांकाचे बक्षिस ५१००० रुपये तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस ३१००० रुपये देण्यात येणार असून प्रथम सात क्रमांकाना बक्षिस तसेच स्मृतीचिन्ह,गदा व ढाल देण्यात येणार आहे.