
लोकशासन- प्रतिनिधी:गणेश गुप्ते,भवानीनगर
राज्यामध्ये २८ एप्रिल हा दिवस ”सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हा दिवस साजरा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबतचे परिपत्रक १ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आले आहे.
राज्यातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा ,पारदर्शक, गतिमान, व कालबद्ध पद्धतीने देण्याकरता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला आहे. अधिनियम हा दि.२८ एप्रिल २०१५ रोजी अंमलात आला आहे.सेवा हक्क दिन साजरा करत असताना कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही. हा दिवस साजरा करण्यासाठी येणारा खर्च राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाच्या अधीनस्थ असलेल्या तरतुदींमधून करण्यात यावा.तसेच सेवा हक्क दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाने निर्गमित कराव्यात महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार दिलीप देशपांडे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी परिपत्रक काढले आहे.