डॉ.बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त हरिनाम सप्ताह – शरद चितारे

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी : संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण

भिगवण मदनवाडी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शरद चितारे यांनी दिली. सदर कार्यक्रमासाठी खासदार चंद्रकांत हांडोरे राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील. मा. आमदार यशवंत माने, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, अध्यक्ष सर्जेराव वाघमारे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर मा. आदर्श सरपंच तुकाराम बंडगर मदनवाडीचे सरपंच अश्विनी बंडगर नानासाहेब बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. डॉ. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पाच दिवस हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने शनिवारी ह.भ.प. अमोल महाराज सुळ यांचे किर्तन होईल यासाठी प्रायोजक म्हणून नवनाथ सोनवणे जाफर मुलानी नवनाथ बंडगर अमोल देवकाते संजय सवाने यांनी सहकार्य केले.

रविवारी ह.भ.प.शामसुंदर महाराज ढवळे यांचे किर्तन होईल यासाठी प्रायोजक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते दादासाहेब थोरात यांनी सहकार्य केले सोमवारी ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांचे किर्तन होईल यासाठी विकास रविंद्र बंडगर रमेश सवाणे यांनी सहकार्य केले मंगळवारी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे किर्तन होईल याकरीता विकास विठ्ठल बंडगर सुनील बंडगर यांनी सहकार्य केले बुधवारी ह.भ.प. मनोज महाराज यादव यांचे सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन होईल यासाठी प्रायोजक म्हणून ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम शिंदे अजिनाथ सकुंडे रविंद्र देवकाते यांनी सहकार्य केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची संयुक्तरित्या जयंती हरीनाम सप्ताहाचे आयोजन करून केल्याने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आल्याचे दादासाहेब थोरात यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button