
लोकशासन- प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सर्व पक्षीय एकत्र बिनविरोध करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याच्या हितासाठी एक पाऊल मागे घेत हि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षीय प्रयत्न चालवले असताना उमेदवारांची मात्र भाऊ गर्दी झाली आहे.कारखान्याच्या २१ जागांसाठी जवळपास ३८५ पात्र उमेदवार आहेत.दादा,मामा,बापु यांच्या पुढे डोके दुखी वाढली असून इच्छुक उमेदवार तळच ठोकून आहेत.
येत्या दोन दिवसात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सर्व पक्षीय श्री जयभवानीमाता पॅनल ची अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.तर दुसरी कडे तानाजी थोरात यांच्या कडून देखील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असुन नाराज उमेदवारांना आपल्या गळाला अडकवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू असल्याने निवडणूक बिनविरोध होणार का निवडणूक लागणार हे ०२ मे ला स्पष्ट होईल.
उमेदवारी निष्ठावंतांना की कारखानदारी मधील अनुभव धारकांना ?
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होताच कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे असल्याचे सांगत पवार जाचक यांनी एकत्र येत संचालक पदासाठी काही अलिखित नियम जसे की विद्यमान संचालकांना पुन्हा संधी नाही, कारखान्या सोबत आर्थिक व्यवहार अथवा ऊस तोडणी टोळी असणाऱ्यांना उमेदवारी नाही, सहकार व कारखान्याची जाण व हित जोपासण्यासाठी तळमळ असणाऱ्यांना प्राधान्य देणे, राजकारणा सोबत संबंध असणाऱ्यांना संधी नको असे अलिखित नियम आखले त्यामुळे संधी निष्ठावंतांना की कारखानदारी मधील अनुभव धारकांना हे दोन दिवसात स्पष्ट होईल.