
लोकशासन- प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण
निरा भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरा भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून या कारखान्याचे सर्व संचालक हर्षवर्धन पाटील यांच्या विचारांचे असल्याने हर्षवर्धन पाटील यांचे या कारखान्या वरती एक हाती वर्चस्व राहिले आहे.
निरा भिमा कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकी नंतर कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली असून अध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदासाठी देखील दादासाहेब घोगरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने घोगरे यांची कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या कडून नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले तर कारखान्याचे दहा वर्षे अध्यक्ष पद भूषवलेल्या मावळते अध्यक्ष लालासाहेब पवार यांचा देखील सन्मान करुन त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
यावेळी अंकिता पाटील ठाकरे , कारखान्याचे संस्थापक संचालक हर्षवर्धन पाटील, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी देवकर, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, अनिल बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे हे संचालक उपस्थित होते.आभार प्रदर्शन कारखान्याचे कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी केले.