
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुक्यातील सणसर फिडर वरील अशोकनगर,भाग्यनगर, येथील सतत वीज खंडित होत असल्याने वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष राज यशवंत कुमार, अँड. संतोष कांबळे संपर्क प्रमुख इंदापूर तालुका, सामाजिक कार्यकर्ते हिम्मत गुप्ते, बापू बनसोडे, संजय दुपारगुडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन संजय सोलवणकर, कार्यकारी अभियंता, बारामती विभाग, ऊर्जा भवन यांना देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अशोकनगर, भाग्यनगर (सणसर) ता. इंदापूर जि.पुणे येथे सणसर फीडर वरील वीज आठवड्या मधील चार दिवस गुरुवार, शुक्रवार, आणि शनिवार, व रविवार, सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत वीज बंद केले जाते, मात्र त्याचवेळी सणसर फिडरवरून बाकीच्या भागांमध्ये सुरळीतपणे विजपुरवठा सुरू असतो त्याच पद्धतीने या भागातील देखील वीज पूर्ण वेळ चालू ठेवण्यात यावी.
तसेच अशोकनगर व भाग्यनगर येथील वीज बंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.या परिसरातील वीज बंद करणे म्हणजे बहुजन समाजावर अन्याय असून वीज बंद करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत ॲट्रॉसिटी कायदा १९८९ कायद्याचे कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.