कुरवली विविध कार्यकारी सोसायटी वर सर्वपक्षीय आघाडीचा दणदणीत विजयी

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण

कुरवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कुरवली तालुका इंदापूर यांची सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती एकूण १३ जागेसाठी निवडणूक प्रक्रिया रविवार दिनांक २७ रोजी पार पडली.सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यत मतदान पूर्ण करण्यात आले .आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ६ वा. पर्यंत कालावधीमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये एकूण १३ जागेसाठी निवडणुक प्रक्रिया झाली .त्यापैकी एक जागा बिनविरोध निवडून आलेले आहे. एकूण १२ जागेसाठी मतदान घेण्यात आले. निवडणुकांमध्ये श्री सिद्धनाथ ,श्री ज्योतिर्लिंग,मेसाई देवी, जय हनुमान सर्वपक्षीय आघाडी व जय हनुमान शेतकरी विकास पॅनल आमने सामने होते.

सर्वपक्षीय आघाडी मधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी मतदार संघामधून

१) शंकर जगन्नाथ चव्हाण २) अविनाश शंकर कदम ३) मयूर तानाजी माने ४) गणेश माणिक पांढरे ५) नानासो नामदेव कदम ६) विठ्ठल भालचंद्र माने ७ )चांगदेव सर्जेराव चव्हाण

महिला राखीव मतदार संघातून

१) रतन मारुती साळुंखे २) सुषमा युवराज यादव

भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून

१) महेश शिवाजी पांढरे

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून

१) राजेंद्र गोपाळ खरात हे बिनविरोध निवडून आलेले आहेत.

जय हनुमान शेतकरी विकास पॅनल मधील सर्वसाधारण मतदार गटातून

१) स्वप्निल बाळासो माने व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून १ )अनिल मोहन माने हे दोन उमेदवार निवडून आलेत.

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एस कदम यांनी काम पाहिले. या निवडणुकीमध्ये एकूण ५०९ सभासद होते. त्यापैकी ४९७ मतदान झाले.कुरवली विविध कार्यकारी सोसायटी मध्ये ३६० मतदार कमी होवून देखील सभासद शेतकरी यांनी सर्वपक्षीय आघाडी उमेदवाराना विजयी केले.त्याबद्दल इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास माने यांनी सभासद शेतकरी यांचे आभार व्यक्त करून विजयी उमेदवार यांचे अभिनंदन केले.

निवडणूक मध्ये विजयी उमेदवारांचे श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक दत्तात्रेय सपकळ, कुरवली ग्रामपंचायतचे सरपंच राहुल चव्हाण,सदस्य विजय पांढरे,शिवाजी चव्हाण,दत्तात्रय दणाणे,छगन जगदाळे ,कै.अण्णासाहेब पांढरे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश पांढरे ,बाळाप्पा पांढरे ,दिलीप पांढरे ,उद्योजक अभिजीत माने,पैलवान नितीन माने,माजी उपसरपंच आंबादास कवळे ,रामचंद्र चव्हाण,तानाजी सपकळ,हनुमंत तनपुरे, यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button