
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते असे म्हटले जाते मात्र भवानीनगर मध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मस्तवाल वॉचमन ने एका आठ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली. त्या वॉचमन वरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी केली आहे.अभिषेक पवन कुमार वय वर्षे -८ असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे.

या मुलाचे वडील भंगाराच्या दुकानांमध्ये काम करून आपली व मुलाची उपजीविका करतात. या मुलांची आई वारली आहे.आईविना पोरखा झालेला हा मुलगा आज दि.(०२) रोजी दुपारी सायकल खेळत असताना रांगोळी पुसण्याच्या कारणावरून कारखान्याच्या वॉचमन ने त्यास भयंकर बेदम मारहाण केली. इतके बेदम मारले की त्याच्या पाठीवरती वळ उटलेले आहेत.
देवाने या मुलावरती अन्याय तर केलेलाच आहे.मात्र या मुलाला मारहाण करताना वाचमनला थोडे देखील किंव आलेले नाही.या मुलाची पाठण पूर्ण काळीनिळी झालेली आहे.अशा मस्तवाल वाचमेन वरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.