महाराष्ट्र ही संताची, शूरवीरांची, कष्टकऱ्यांची, कामगारांची  भूमी – माजी आमदार उल्हास पवार

Spread the love

कामगार हा जगाचा निर्माता ही सृष्टी कामगारांच्या कष्टावर उभी राहिली आहे – ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस

लोकशासन-प्रतिनिधी : शंकर जोग,पुणे

महाराष्ट्र ही संताची, शूरवीरांची, कष्टकऱ्यांची, कामगारांची  भूमी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले आहेत. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत उल्हासदादा पवार यांनी केले.

जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल आणि झोपडपट्टी सुरक्षा दल या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत उपेक्षितांना न्याय देण्यासाठी जीवाची परवा न करता सातत्याने आक्रमकपणे अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा उभा केला. अशा कार्यकर्त्यांना  सन्मानित करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हास दादा पवार हे होते. तर कार्यक्रमाचे संयोजक भगवानराव वैराट हे होते.

या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस ‌‌यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कामगार नेते राजन नायर यांना नारायण लोखंडे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

श्रीपाल सबनीस म्हणाले की ही सृष्टी कामगारांच्या कष्टावर उभी राहिली आहे. कामगार हा जगाचा निर्माता आहे म्हणूनच जगातल्या कामगारांनी एक होण्याच्या दृष्टीने जे तत्वज्ञान मानलं जो इतिहास निर्माण केला त्या कामगारांच्या कष्टाची त्याच्या कामाची आठवण ठेवण्यासाठी त्याला वंदन करण्यासाठी १ मे हा दिवस महत्वाचे आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही फार मोठी होती. या चळवळीत अनेकांनी प्राणांची आहुती दिली होती. या दिनी मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे.

राजन नायर म्हणाले की देशात महाराष्ट्राचे योगदान हे फार मोठे आहे. महाराष्ट्रातील कामगार चळवळ ही सर्वांना न्यात आहे. पुण्यातील पिंपरी – चिंचवड ही उद्योगनगरीने अनेक रिकाम्या हातांना काम दिले आणि देत आहे.  नारायण लोखंडे यांच्या नावाच्या पुरस्काने मला सन्मानित केले. याचा मला सार्थ अभिमान आहे. ब्रिटिश राजवटीत लोखंडे यांच्यामुळे देशभरातील कामगारांना रविवारी सुट्टी मिळाली.

सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवानराव वैराट यांनी केले तर सूत्रसंचालन के. बी. गायकवाड यांनी केले.

होय, हि भूमी आम्ही सुजलाम सुफलाम केली – भगवानराव वैराट

महाराष्ट्राच्या मातीचा जितका इतिहास ज्ञात आहे. तो जसा संघर्षचा आहे तसाच नांगराच्या फाळाच्या आहे. संबंध हिंदुस्थानाच्या ज्ञात इतिहासात फक्त महाराष्ट्र असा आहे. की ज्या हाताने तलवार धरली त्यांचे प्रशासकीय शिक्के नांगर आहेत. होय हि भूमी आम्ही सुजलाम सुफलाम केली. अन त्याच्या रक्षणासाठी आम्ही शस्त्र हि हातात धरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button