
लोकशासन-प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या अखेर च्या क्षणा पर्यंत घडामोडींनी वेग घेतला.अजित पवार व पृथ्वीराज जाचक एकत्र येऊन हि निवडणूक बिनविरोध होईल किंवा नाममात्र होईल असे वाटत असतानाच श्री छत्रपती बचाव पॅनलने निवडणूकीत मोठे आवाहन जाचक व पवार यांच्या समोर उभे केले आहे.
सुरुवातीला एकाएकी होईल असे वाटणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अविनाश घोलप यांच्या प्रवेशाने रंगत निर्माण झाली असून हि निवडणूक वाटते तेवढी सोपी राहिली नसल्याचे चित्र दिसत आहे.
माजी आमदार राजेंद्र घोलप यांचे चिरंजीव व छत्रपती साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप यांना मानणारा मोठा वर्ग असुन अविनाश घोलप यांचे चिरंजीव व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप हे स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.तर घोलप यांच्या सोबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तानाजीराव थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम काळे हे श्री छत्रपती बचाव पॅनल मधुन निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
करणसिंह घोलप यांना प्रांत कार्यालयाच्या आवारातच धक्काबुक्की
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या अखेर च्या दिवशी अनेक घडामोडी पहायला मिळाल्या असून अगदी अखेरच्या क्षणी पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप यांना प्रांत कार्यालयाच्या आवारातच धक्काबुक्की झाल्याची चित्रफीत समाज माध्यमातुन मोठ्या प्रमाणात फिरत होती.त्यामुळे छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक वाटते तेवढी सोपी राहिली नसल्याचे दिसून येत आहे.
श्री छत्रपती बचाव पॅनेल उमेदवार यादी
गट नं. १ लासुर्णे
१) श्री. संजय सोमनाथ निंबाळकर
२) श्री. प्रताप मोहन पवार
गट नं. २ सणसर
१) श्री. संग्राम दत्तात्रय निंबाळकर
२) श्री. अभयसिंह विठ्ठलराव निंबाळकर
गट नं. ३ उध्दट
१) श्री. करणसिंह अविनाश घोलप
२) श्री. तानाजी साहेबराव थोरात
गट नं. ४ अंथुर्णे
१) श्री. राजेंद्रकुमार बलभिम पाटील
२) श्री. बाबासो भगवान झगडे
गट न ५ सोनगाव
१) रवींद्र भीमराव टकले
गट नं. ६ गुणवडी
१) श्री. नितीन अशोक काटे
ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन
१) श्री. सत्यजीत भाऊसाहेब सपकळ
अनुसूचित जाती/जमाती
१) श्री. बाळासो उर्फ भाऊसो गुलाब कांबळे
महिला राखीव
१) सौ. सिता रामचंद्र जामदार
२) सौ. पद्मजा विराज भोसले
इतर मागास प्रवर्ग
१) श्री. संदिप वसंतराव बनकर
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास
१) श्री. तुकाराम गणपत काळे