
लोकशासन-प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
इस्टाग्रामवरती केलेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा खून करण्यात आला. वालचंदनगर पोलिसांनी अवघ्या पाच तासांमध्ये आरोपीस अटक केली.
आकाश मुशा चौगुले वय – २२ रा. अंथुर्णे ता.इंदापुर जि.पुणे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजेश उर्फ तात्या सायबु पवाररा. अंथुर्णे ता.इंदापुर जि.पुणे याच्यावर ती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आकाश पवार आणि राजेश उर्फ तात्या पवार हे दोघे नातेवाईक असून ”तू माझ्या बहिणीचा फोटो इस्टाग्रामवरती मेसेज द्वारे मला का पाठवला”असा जाब विचारण्यासाठी आकाश चौगुले व त्यांची आई शांताबाई चौगुले हे राजेश पवार यांच्याकडे गेले.जाब विचारत असताना त्याचा राग मनात धरून राजेश पवार यांने त्याच्या हाताने आकाश चौगुले याचा जोरात गळा पकडून व दाबून त्याला उचलून त्याच्या घरासमोर पडलेल्या दगडावरती जोरात आपटले. त्यावेळी आकाश चौगुले निपचित पडल्याचे पाहून त्याचा धरलेला काळा सोडून राजेश उर्फ तात्या पवार हा तिथून त्याच्या मोटरसायकल वरून कोणाला काही समजायच्या आत पळून गेला.
आकाश चौगुले याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तो उपचारापूर्वी मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.याबाबतचे माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांना माहिती प्राप्त होताच पोलीस पथकासह घटनास्थळावर भेट देऊन घटनेची माहिती घेतली .पोलीस अधीक्षक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, यांना दिली.त्यांच्या सूचनेनुसार मारहाण करणारा आरोपी याचा शोध घेण्यासाठी वालचंदनगर पोलीस ठाणे यांच्याकडील वेगवेगळे तीन पथके तयार करण्यात आली.ही पथके बारामती तालुका व इंदापूर तालुका या दिशेने रवाना करण्यात आली.या आरोपीचा शोध घेत असताना तो कडबनवाडी (ता.इंदापुर) गावच्या हद्दीत वनविभागाच्या क्षेत्रात लपून बसल्याची गोपनीय माहिती गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली.आरोपीला पोलीस आल्याची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत तो पळून जाऊ लागला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.
यावेळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्रय चांदणे, जगदीश चौधर, विकास निर्मळ, अभिजीत कळसकर, विक्रमसिंह जाधव, यांनी कामगिरी पार पाडली.