
लोकशासन- इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली असून.अनेक ठिकाणी विजेचे खांब,झाडे पडली आहेत.तर निरा नदी चे पाणी पात्रा बाहेर पडले आहे.बऱ्याच ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
इंदापूर व बारामती तालुक्यात पावसाने थैमान घातले असून त्यातच निरा डाव्या कालव्याला मोठे भागदाड पडले असून यामुळे पाण्याच्या प्रवाहात कमालीची वाढ झाली आहे.आठ दिवसा पासून या भागात पाऊस होत असुन २५ मे रोजी अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार घातला आहे.प्रशासना कडून सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या असून मदतीची आवश्यकता लागल्यास खालील तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तालुक्यातील खालील प्रशासना सोबत संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

रात्रीच्या वेळी नागरीकांनी घाबरून न जाता जागृत राहून आपल्या परीसरातील परीस्थितीची माहिती घ्यावी व सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.पाऊस सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

इंदापुर तालुक्यातील सणसर येथे मदत कार्यात स्वतः इंदापूर चे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी घटनास्थळी मदत कार्यात उतरून पोलीस प्रशासना सोबत मदत केली.