इंदापूर बारामती तालुक्यात अवकाळी पावसाने हा..हाकार !

Spread the love

लोकशासन- प्रशासन : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण

इंदापूर आणि बारामती तालुक्यात अवकाळी पावसाने आज हाहाकार माजवला इंदापूर मध्ये पाऊसाचे रौद्ररूप धारण केल्याने पावसाचे पाणी पाहून नागरिक भयभीत झाल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात दिसत होते.
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर ,पळसदेव,कळस,बोरी,काझड,बेलवाडी, जंक्शन,या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

सणसर येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तळ या ठिकाणी ओढ्याला नदीचे स्वरूप आले होते.
ओढ्याच्या काठी राहत असलेल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून घरातील संसारासाठी लागणा-या वस्तू पुराच्या पाण्यात वाहुन गेल्या.घरच्या घरे पावसाच्या पाण्यानें तुडुंब भरले होते.

इंदापूर वरून पुण्याला , बारामती या कडे प्रवास करणारी वाहणं तब्बल चार ते पाच तास ओढ्याच्या काठी अडकुन पडले .’ना भुतो न भविष्य’ अश्या प्रकारे पावसाच्या पाण्याने प्रवाह धरला होता.
सणसर मधील रस्त्याचे काम सध्या सुरू असुन हा पुल पाण्यामुळे खचला होता पूर्णपणे वाहतूक बंद होती.इंदापूर तालुक्यातून बारामती तालुक्यामध्ये जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने अनेक वाहन चालक खोळबुन पडली होती.
याचवेळी इंदापूर चे गटविकास अधिकारी सचिन खुडे, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश शिंदे,सतीश फुलारे, पोलीस उपनिरीक्षक, रोहिदास चौधरी यांनी या भागातील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली होती.

गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी सणसर पुलाची पाहणी केली व खबरदारी बाबत सुचना दिल्या.
थांबलेल्या वाहन चालक यांनी पर्याय मार्ग म्हणून बोरी,काझड,कळस,जाचकवस्ती,निंबोडी, वरून जाण्याचा प्रयत्न केला.बारामती कडे जाण्याचा कोणताच मार्ग मिळाला नाही.निंबोडी वरून भवानीनगर दिशेने भोईटे वस्ती नजीक पाण्याचा ओढा आहे तो ही पूर्ण क्षमतेने वाहत होता.मात्र निबोडीचे पोलीस पाटील मनोज होडशीळ त्या ठिकाणी वाहन चालक यांना मदत करत होते मात्र त्या ठिकाणी पोलीस गरजेचे असताना ही कोणतेही पोलीस कर्मचारी नव्हते.
सणसर येथील पुरात गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या वाहुन गेल्याचे नागरिकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button