मदनवाडी परिसरात अवकाळी पावसाने कहर, ओढे-नाल्यांना पूर !

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,पुणे ग्रामीण

इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसाने कहर करीत मदनवाडी, भिगवण,लाकडी, पोंधवडी, भादलवाडी या गावातील वाड्या वस्तीवरील रस्ते आणि शेती परिसर जलमय करून सोडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस येत होता. मात्र रविवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढून दिवसभर सुरू असलेल्या पावसाने शेतातील बांध फुटून ओढ्या नाल्याना पूर आले आहेत.

या पावसाने मागील रेकॉर्ड मोडीत वीस वर्षात कधीच असा पाऊस झाला नसल्याचे ज्येष्ठ लोकांकडून सांगण्यात येत आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे मागील कधीच वीस वर्षात असा पाऊस झाला नसल्याचे ज्येष्ठ लोकांकडून सांगण्यात येत आहे शेटफळगढे, लामजेवाडी येथील भागातही भरपूर पाणी साचले आहे. तसेच मदनवाडी गावाला जोडणारे आजूबाजूचे रस्ते पाण्यामुळे जलमय झाले आहेत.

शेतातील उसाच्या पिकामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. तसेच गावाच्या आजूबाजूच्या असणाऱ्या तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले असून जनावरांना चारा देण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेतातील पिकामध्ये पाणी साचल्याने तळ्यांचे स्वरूप आले आहे. कांदा काढलेल्या अडीमध्ये पाणी घुसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button