
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर परिसरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.एकीकडे अवकाळी पाऊस सुरू आहे तसेच विज देखील गायब होत आहे यांचाच फायदा घेत चोरट्यांनी सध्या भवानीनगर परिसरात आपला मोर्चा वळवला आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी श्री छत्रपती कामगार काॅलनी येथे कामगार काॅलनी मध्ये चोरट्यांनी सोने व रोख रक्कम वरती डल्ला मारला.दि.(२४) रोजी रात्री ११ वा.दरम्यान भवानीनगर येथील व्यापार पेठेतील श्री ज्वेलर्स मध्ये खिडकी कटरच्या साह्याने तोंडुन पाच चोरट्यांनी ज्वेलर्स दुकानांमध्ये प्रवेश करत सोने व चांदी वरती डल्ला मारला.हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असुन आज दि.(२६) रोजी वालचंदनगर पोलीस यांनी भवानीनगर मधील श्री ज्वेलर्स या दुकानांची पाहणी केली असुन याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.