
लोकशासन- प्रतिनिधी गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
सणसर महावितरण परिसरात गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून सणसर मध्ये ओढ्याला पूर आल्याने वीज पुरवठा पूर्ण खंडित झाला होता. यामुळे सणसर परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी जीवाची बाजी लावत काही तासातच वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. सणसर महावितरणचे अधिकारी पी.एस.गवसणे व त्यांचे सहकारी वायरमन यांनी दाखवलेली तत्परता ही खरंच दखल घेण्या योग्य आहे.असे मत सणसर परिसरातील वीज ग्राहकांनी केली आहे .विज ही आपली जीवनावश्यक बाब असुन यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी यासाठी वीज अत्यंत महत्त्वाची असून गेल्या चार ते पाच दिवसापासून अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीचे खांब पडलेले आहेत.हे खांब पुन्हा उभे करण्यासाठी किती वेळ लागणार आहे .हे आव्हान सणसर महावितरण पुढे असताना देखील काही तासांमध्येच सणसर महावितरणचे शाखा अधिकारी पी.एस.गवसणे ,व्ही.एस.काळे ज्युनियर टेक्निशियन ,एस.जे.गाढवे ऑपरेटर, उपकेंद्र सहाय्यक आय.एस.भोसले,जी.डी.जाधव, संदीप तांदळे,एस.एन.बिरादार,आर.एन.गवळी मॅडम, विद्युत सहाय्यक एस.आर.देशमुख ,ए.बी.शिदे, यांनी सणसर परिसरातील काही तासांमध्येच अशक्य होते ते शक्य करून दाखवले व वीज पुरवठा पूर्ववत केला.याबाबत सणसर परिसरातील वीज ग्राहकांनी संसार कार्यालय मध्ये जाऊन या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.