
लोकशासन- प्रतिनिधी गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी केली.भवानीनगर येथे रेशन दुकानांमध्येपाहणी केली.
ज्या नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी जाऊन अन्नधान्याचे नुकसान झाले आहे.आशा नागरिकांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ दहा किलो गहू देण्याचे तात्काळ आदेश दिले.शेतीमध्ये जे नुकसान झाले आहे याचे देखील पंचनामे सुरू आहेत का याची पाहणी केली.
तावशी, उद्धट, मानकरवाडी, पवारवाडी, कुरवली,निबोडी, सणसर, काझड, गावांना भेटी दिल्या.यावेळी भवानीनगर तलाठी उज्वला भगत, सोसायटीचे चेअरमन संजय मुळीक, अंकुश जगताप, कुंदन वाघ, आज नागरिक उपस्थित होते.