संत सावता माळी प्रतिष्ठान संचालक मंडळाच्या वतीने भाजप अध्यक्ष राजकुमार जठार यांचा सन्मान !

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण

भारतीय जनता पार्टी च्या इंदापूर तालुका मंडल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निमगाव केतकी येथे संत सावता माळी प्रतिष्ठान संचालक मंडळाच्या वतीने नुतन मंडल अध्यक्ष राजकुमार जठार यांचा सन्मान करण्यात आला‌.यावेळी सावता माळी ट्रस्टचे अध्यक्ष भानुदास राऊत,उपाध्यक्ष ॲड संदिप शेंडे,सचिव पत्रकार नीलकंठ भोंग सहसचिव सागर ढगे,संचालक दादासाहेब शेंडे माजी अध्यक्ष मंगेश भोंग, माजी सचिव मारूती भोंग भाजपा युवा नेते आदित्य जठार उपस्थितीत होते.यावेळी बोलताना जठार यांनी सांगितले की निमगाव केतकी मधील श्री संत सावतामाळी मंदिर सुशोभीकरण साठी पुणे जिल्ह्याचे सह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विकास निधीतून दहा लक्ष निधी जाहीर केला असुन भविष्यात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकास निधी खेचून आणुन विकासात्मक कामा वरती भर दिला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button