
लोकशासन – इंदापूर ग्रामीण
राज्यभरातील शाळांमध्ये आज नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साही सुरुवात झाली. उन्हाळी सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि आनंद ओसंडून वाहत होता. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालय मध्ये पहिल्या दिवशी भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार जठार व पालकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या आवारात गुलाब पुष्प देऊन आणि विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष राजकुमार जठार यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थी यांनी मोबाईल पासून दूर राहावे तसेच शिक्षकांनी विद्यार्थी यांना शिकवत असताना रागवली मारले तरी पालकांनी मुलांच्या भविष्यासाठी दुर्लक्ष करून शिक्षकांच्या पाठीशी राहून त्यांचे मनोबल वाढवावे असे सांगितले.शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांना शाळे मार्फत शालेय पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक श्री माणिक भोंग सर, यांनी विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्क्ष राजकुमार जठार,पत्रकार दत्ता मिसाळ, बबन बोराटे, भाजपा नेते ललित होले , समाजसेवक श्री पपू शेख, पालक,उपमुख्यद्यापक श्री के.डी.भोंग सर, हेंद्रे सर, गिरीष महामुनी सर, व इतर शिक्षक स्टॉप उपस्थित होता . मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्षात होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक भोंग सर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.प्रस्ताविक श्री के. डी. भोंग सर यांनी केले. पहिल्यांदाच पाचवीच्या शाळेचा अनुभव घेणाऱ्या विद्यार्थी यांचे स्वागत विशेष उत्साहात झाले. ज्यामुळे वातावरण आणखी उत्साहवर्धक झाले होते.दरम्यान शाळेच्या परिसरात गोंगाट, हशा आणि हसण्याच्या आवाजांनी पुन्हा एकदा जीवन फुलले होते.एकंदरीत, शाळेचा पहिला दिवस हा आनंद, उत्साह आणि नव्या संकल्पांनी भरलेला होता. पाचवीच्या विद्यार्थी यांना नवीन पुस्तके, नवीन वर्ग, नवीन मित्र आणि नवीन स्वप्नांसह विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक वर्षात पहिले पाऊल टाकले.