
लोकशासन- इंदापूर ग्रामीण
इंदापूर : निमसाखर (ता.इंदापुर) येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. दरम्यान जयंती निमित्त ३०० झाडे शाळांना भेट म्हणुन देत पुढे प्राथमीक शाळा परिसर व अन्य भागात या झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे.
निमसाखर (ता.इंदापुर) येथील शाॅपिग सेंटर लगतच्या ठिकाणी नुकतेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती निमसाखर यांच्या वतीने जयंती निमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले.सुरूवातील व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होळकर यांच्या मूर्तीला हार , फुले आणि भंडारा वाहून अभिवादन करण्यात आले.यावेळी व्याख्याती साक्षी सोलनकर यांच्यासह धैर्यशील रणवरे, नंदकुमार रणवरे ,रणजित रणवरे,विरसिंह रणसिंग,सुदर्शन रणवरे, काका पाटील,संतोष रणवरे, सदाशिव आडसुळ आदि समितीचे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी इयत्ता १२ वीत शिक्षण घेणाऱ्या व्याख्येती साक्षी सोलनकर म्हणाली की पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण , प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला.सुधारना करीत असताना त्याच प्रमाणे लोकांमधे समानता आणण्याचे काम करीत आहिल्यादेवी नी आपल्या सेने मध्ये पुरुषा ना संधी देत त्याच प्रमाणे महिलानाही संधी मिळत होती. म्हणुनच आहिल्यादेवी नी सैन्यामध्ये महिलांची ही एक मोठी तुकडी खास सामावुन घेतल्याचे यावेळी सोलनकर यांनी सांगीतले.