इंदापुर तालुक्यातील अनेक शाळा कॉलेज मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे नाहीतच !

Spread the love

लोकशासन- उपसंपादक:गणेश गुप्ते,इंदापूर

इंदापूर : दि. १७ राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या करावयाच्या उपाययोजना बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णयानुसार सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.मात्र इंदापूर तालुक्यातील बहुतांशी शाळेतील मुला मुलींची सुरक्षिता रामभरोसेच आहे.इंदापूर तालुक्यातील अनेक शाळा शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत असून अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आलेले नाहीत हे सीसीटीव्ही कॅमेरे कधी बसवण्यात येणार असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे.

शाळांमध्ये टोल फ्री हेल्पलाइन नंबर १०९८ (किंवा बदललेला नवीन क्रमांक नंबर) एका प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केला जावा जिथे मुले ते नोंदवू शकतात .या क्रमांकावर कधी आणि कोणत्या परिस्थितीत साधता येईल याची माहिती मुला-मुलींना देणं बंधनकारक आहे. शाळेच्या दृश्यमान भागात शाळेच्या अंतर्गत संरक्षण भिंतीवर आणि शाळेचा इमारतीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत माहिती देण्यासाठी माहितीचे फलक चित्रे किंवा डिजिटल डिस्प्ले बोर्ड वापरून प्रदर्शित केले जावेत.

सर्व शाळांना चोहोबाजुनी भिंती आणि मुख्य प्रवेशद्वार असावे मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असावा शाळेच्या परिसरामध्ये अनाधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची दक्षता घेण्यात यावी मात्र इंदापूर तालुक्यामध्ये याउलट चित्र आहे. विद्यार्थी शाळेच्या परिसरात उपस्थित असताना त्याच्या सुरक्षेतेची संपूर्ण जबाबदारी ही शाळांची असते मात्र याबाबत देखील अनेक शाळा अन्नभिन्न आहेत. शाळेतील मुलांच्या उपस्थितीबाबत संदर्भात सकाळी, दुपारी, शाळा सुटण्याच्या वेळी हजेरी नोंदवण्यात यावी व अनुपस्थित विद्यार्थ्याबाबत त्याच्या पालकांना मोबाईल एसएमएस द्वारे कळवण्यात यावे आशा निर्देश शासनामार्फत दिलेले आहेत याचे देखील पालन अनेक शाळा कडून होत नसल्याचा आरोप आणि पालकांनी केला आहे.

पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर मुलांना ”चांगला स्पर्श व वाईट स्पर्श”(गुड टच आणि बँड टच ) याबाबत प्रात्यक्षिके देऊन यातील फरक ओळखायला शिकवण्यात यावे याबाबत देखील अनेक शाळांमध्ये जनजागृतीचा अभाव आहे. अनेक शाळांमध्ये सखी- सावित्री समिती गठीत करण्यात आली मात्र या समितीची कार्याबाबत पालक आणि विद्यार्थी सम्रभात आहेत ही समिती कशासाठी आहे? हेच मुळात पालकांना विद्यार्थ्यांना माहिती नाही याबाबत देखील जनजागृती करण्यासाठी शाळांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता शाळा व परिसरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे .

मात्र इंदापूर तालुक्याच्या अनेक भागांमध्ये अनेक शाळांना सीसीटीव्ही नाहीत. तसेच अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांची खोली वगळून सर्वत्र सीसीटीव्ही दिसतात हे काय गौडबंगाल आहे ? याकडे देखील शासनाने व शिक्षण विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. सध्या तरी इंदापूर तालुक्यामधील अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे चित्र आहे.ज्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत अशा शाळांची चौकशी करून तात्काळ त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची व्यवस्था करण्यात यावी असे मागणी पालक वर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button