संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी धवलसिंह मोहिते-पाटलांचे “बलराज” अश्व रवाना !

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी : सत्यजीत रणवरे

सोलापूर:जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी परंपरे प्रमाणे या वर्षी देखील धवलसिंह मोहिते पाटील यांच्या ‘बलराज’ या अश्वाचे विधिवत पूजन करून प्रतापगडावरुन देहू च्या दिशेने रवाना करण्यात आले.

मोहिते-पाटील कुटुंबांकडून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी मानाचा अश्व देण्याची परंपरा माजी‌ मंत्री स्व प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सुरवात केली आहे.साधारण गेली ४० ते ४५ वर्षां पासून हि परंपरा अखंडित चालू असून स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या नंतर डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून पालखी सोहळ्यासाठी अश्वसेवा देण्याची परंपरा अविरतपणे चालू आहे.परंपरे प्रमाणे या हि वर्षी उच्च कुळातील, मारवाडी जातीचा,सर्व शुभ लक्षणे असलेला ‘बलराज’ हा अश्व पालखी सोहळ्यासाठी रवाना करण्यात आला असून गेली चार ते पाच वर्षां पासून बलराज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सेवा देत आहे.या अश्वास वर्षभर विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते तसेच भाविकांच्या गर्दीमुळे बुजू नये यासाठी वर्षभर त्याची तयारी देखील करून घेतली जाते असे डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

यावेळी‘प्रतापगड’ या मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी बलराज आश्वाचे पूजन धवलसिंह मोहिते पाटील आणि पद्मजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब इनामदार,सतीश पालकर,अण्णासाहेब शिंदे, मयूर माने नवनाथ साठे, डॉ.चंद्रकांत कोळेकर,घोडेस्वार वैभव गायकवाड यांच्यासह जनसेवेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button